“लग्नानंतर माझं आयुष्य म्हणजे एक टिपिकल गृहिणी म्हणून जगणं चालू होतं, लॉकडाऊन दरम्यान आथिर्क कोंडी फोडण्यासाठी पाऊल उचलावे लागले आणि मला व्यावसायिक सुरू करण्याची संधी मिळाली, वाचताना या पुस्तकातील विधी प्रमाणे मीही काही घरगुती पर्याय चाचपडत आले आहे, स्वयंपाक, मुलं, व्यवसाय, ग्राहक या सगळ्याच ठिकाणी मग तारांबळ, अनाठायी धावपळ अंगावर आली आणि तब्येतीला मोठा झटका लागला, या सगळ्या युद्धात कुरुक्षेत्रावर गोंधळल्या स्थितीत उभे असताना जणू श्रीकृष्ण प्रमाणे हे पुस्तक पुढ्यात आलं आणि आपल्या कामाचा गिथार्थ कळून आला. आता तब्बेत, व्यवसाय आणि इतर सगळ्या ठिकाणी कस हँडलिंग करावं याचा विश्वास आलाय. हे पुस्तक माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत आणि लग्नाअगोदर मनात करिअर करण्याची इच्छा, महत्त्वकांक्षा होती. लग्ना नंतर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला ही असेल. महिलाच्या आणि मुलीच्या आयुष्यात लग्नानंतर आयुषमान बदलून जातं, मनातल्या इच्छा ज्या असतात त्यांना वेगळं वळण लागत हे पुस्तक वाचलं तर शिकण्यात येईल की एकप्रकारच वर्कशॉप आहे. कुठलं काम व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्यांना ट्रेनिंग घेता येत नाही रोजच्या कामामधून, किचनमधून जाता येत नाही, हे पुस्तक घेवून वाचून काढले तरी चांगली अशी प्रेरणा मिळेल आणि अस्ताव्यस्त आणि अतिव्यस्त पेक्षा प्रॉपर मार्ग निघेल आत्मविश्वास वाढेल.”